Saturday, December 20, 2008

माझ्या काही आवडत्या चारोळ्या

माझया काही आवडत्या चारोळ्या, श्री चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या : 
 ९) तुला मी कधी 
शपथ घ्यायला लावत नाही 
कारण तुझ्यावरचा विश्वास 
या इवल्या शब्दात मावत नाही 

 ८) गप्पच रहावसं वाटतं 
तुझ्याजवळ बसल्यावर 
वाटतं तूच सगळं ओळखावं 
मी नुसतं हसल्यावर 

 ७) 'मीठी' या शब्दात 
किती मिठास आहे, 
नुसता उच्चारला तरी 
कृतीचा भास् आहे ! 

 ६) सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला 
जेव्हा पालवी फुटली, 
मलाच कळेना 
ही जगायची जिद्द कुठली ? 

 ५) चिंब भीजल्यावर तहान लागते ना 
तसं होता तुला भेटल्यावर, 
तुलाच पाहत रहावसं वाटतं 
तुझ्या कुशीत मिटल्यावर 

 ४) सगळ तुला देऊन 
पुन्हा माझी ओंजळ भरलेली, 
पाहिलं तर तू तुझी ओंजळ 
माझ्या हातात धरलेली 

 ३) माझ्या तळहातावर 
एकदा एक फुलपाखरू येउन बसलं, 
मी सवयीनं मुठ वळणार 
इतक्यात ते विश्वासानं हसलं 

 २) देउळात जाउन ही लोकं 
दुकानात गेल्यासारखी वागतात, 
चार-आठ आणे टाकुन 
काहीना काही मागतात 

 १) आपण त्याची सोबत धरावी 
ज्याला आपण आवडतो, 
नाही तर आपल्या आवडीसाठी 
आपण उगीच आयुष्य दवडतो ।

No comments:

Post a Comment