आठवणींच्य बागे मध्ये जशी सुखद क्षणांची फुले असतात, तशीच काही अप्रिय निवडुंग ही असतात
आज त्या बागे मध्ये एक चक्कर मारताना वाटले की कधी तरी हे निवडुंग ही जवळून पहावे
निरखताना आज त्यांचे प्रकार लक्षात आले - काही काटे निव्वळ टोचतात, काही ज़रा जास्त त्रास देणारे, खोलवर रुततात
मग आठवली ती ओरबाडून, रक्त बम्बाळ करून सोडणारी निवडुंग
ह्यांच्या पासून जपून राहिले पाहिजे, अशी मी स्वतःशिच एक नोंद केली
मनाचा वेध घेताना मी विचार करत होतो की असा सर्वात जास्त दुखः देणारा प्रसंग कोणता आहे?
आणि माझ्या लक्षात आले की त्या प्रसंगाचा काटा माझ्या मनात खोलवर रुतला होता - अजुनही मला सलत होता
लहानपणी आजी लिंबाचं लोणचं बांधुन, त्यांना कातेतुन ओढून काढत
आजी, आज ही तसं एखादं लोणचं आहे का गं, ह्या आठवणीतल्या काट्यांसाठी ? त्यांना काढून फेकायला ...
No comments:
Post a Comment