सलील आणि संदीपचं नविन गाणं, श्रेया घोशालच्या आवाजात - मला खुपच आवडलं
मराठी (अ)शुद्धलेखानात्ल्या चुका माफ़ असाव्यात ...
Link to You tube video - http://www.youtube.com/watch?v=7EssYh1A47w
चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे,
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे,
उगवत्या उन्हाला ह्या सोन-सळी अंग,
पश्चिमेच्या कागदाला केशरी हा रंग,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा,
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा.
सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा,
घरी परतण्यासाठी पाखारांना दिशा,
मध खाते माशी तरी सोंडे मध्ये डंख,
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
नागोबच्या फण्यावर दहाचा आकडा,
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा,
करवंदाला चिक आणि आळुला या खाज,
कुणीनाही बघे तरी लाजाळुला लाज,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा,
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा.
मुठभर बुलबुल, हाथभर कान,
कोकिलेला कुहू नाहीतरी गाई गान,
काजव्याच्या पोटी जळे गव दिवा,
पावसाच्या अगोदर, ओली होते हवा,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
भीजे माती आणि तरी अत्तर हवेत,
छोट्या छोट्या बियातुन लपे सारे शेत,
नाजुक अशा गुलाबाच्या भोवातिने काटे,
सरळ अशा खोडावर पुढे दहा फाटे,
देते कोण देते कोण देते कोण देते,
देते कोण देते कोण देते कोण देते.
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा,
रूम, रूम, तारा रा रूम, रूम तारा रा रूम, रूम तारा रा रूम तारा.